- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच घडली ही दुर्घटना
नवी दिल्ली, दि. २५ जानेवारी: जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील लखनपूर परिसरात भारतीय सैन्याचं ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत सैन्याचे दोन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही जवानांना सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याचं ध्रुव ALH हे हिलेकॉप्टर टेक ऑफ करताना त्याचा एका तारेला धक्का लागला. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. कठुआचे एसएसपी शैलेद्र मिश्रा यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्घटना घडली आहे.
कठुआचे सिनीयर पोलिस अधीक्षक शैलेंद्र कुमार मिश्रा यांनी दुर्घटनेची पुष्टी करताना सांगितलं की, लखनपूरच्या जवळ भारतीय सैन्याचं ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत 2 पायलट जखमी झाले आहेत. त्यांना पठाणकोटच्या मिल्ट्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.’
Comments are closed.