Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पारंपरिक पद्धतीला फाटा देत महामानवाचे वंदन करूनच केला गृहप्रवेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • प्रबोधनाचेही  केले आयोजन.
  • अनोखे गृहप्रवेश ब्रह्मपुरीत  सर्वत्र चर्चा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

ब्रम्हपुरी दि १० फेब्रुवारी :- थोर विचारवंत थोर महापुरुष यांच्या विचारधारावर नित्य नियमानाने दैनदिनजिवना आचरणात आणून त्याच विचाराचे जोपासना करणारे देशात कुठेच कमी नाही म्हनुनच देशाला विविधतेत एकता असलेला देश म्हटले आहे .पुरोगामी विचाराचे आणि चामोर्शी तालुक्यातील कळमगाव येथील मूळचे रहिवासी असलेले पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, ग्रामसेवक दिगांबर लाटेलवार व वर्षा लाटेलवार या दाम्पत्याने ब्रम्हपुरी येथे त्यांच्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश पारंपरिक पध्दतीला फाटा देत माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला व संविधानाला वंदन करून व उपस्थितांचे प्रबोधन करून अनोख्या पद्धतीने साजरा केल्याने ब्रम्हपुरी शहरात सदर गृहप्रवेश चर्चेचा एक विषय ठरला आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रत्येकालाच आपले स्वप्नातील घर कसे असावे या साठी आटापिटा करून आयुष्याची सर्व कमाई त्यासाठी खर्ची घातल्या जाते वैज्ञानिक व वास्तू शास्त्राचा आधार घेत घराचे बांधकाम केले जाते .मात्र गृहप्रवेश आला की मग वास्तू शांती साठी डोक्यात नानाविध कर्मकांड आपसूकच डोक्यात शिरतात उच्च शिक्षित राहूनही कर्मकांडाने गृहप्रवेश केल्या जात असल्याचे सर्वी कडेच पाहायला मिळत आहे . मात्र पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते लाटेलवार या दाम्पत्याने ना सत्यनारायणा ची पूजा, ना परित्राण पाठ ना कोणतेही पूजा करता ज्या महापुरुषांनी भारतीयांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी त्याग केला, आपले सर्वस्व पणाला लावले; शिक्षणाचा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला अशा थोर महापुरुष बुद्ध,शिव फुले शाहू आंबेडकर, ग्रामगीता,तुकोबा चे अभंग, बुद्ध भूषण व भारतीय संविधानाला वंदन करून गृहप्रवेश करून  “आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे समाजाला पुरोगामी विचारांची दिशा देण्याचे कार्य लाटेलवर दाम्पत्याने केले या प्रसंगी लाटेलवर यांनी उभारलेल्या भिंतीवर उभारलेल्या बुद्ध,शिव फुले शाहू आंबेडकर, यांच्या तैल चित्रांचे फीत कापून गृहप्रवेश केला त्यानंतर “राष्ट्रसंतांचे विचार व समाज जागृती” या विषयावर प्रबोधनकार कृषीराज लाटेलवार व त्यांचा संचा द्वारे प्रबोधन  करण्यात आले प्रबोधनात महापुरुषांचे विचार केवळ माहिती म्हणून मर्यादित न ठेवता  त्यांचा कार्याचा प्रसार होईल असे छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करावेत. असे सांगितले यावेळी सहायक गटविकास अधिकारी एम ई कोमलवार,प्रा नक्कलवार ,आसमपल्लीवार,लक्ष्मण माहूर्ले,प्रा अरुण आलेवार ,किशोर नगराळे, दौलत पोवरे, योगपती रामगिरीकर,गुरुदेव वांढरे समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.