Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुण्यातील सचिन शिंदे गोल्डमॅनची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क 10 फेब्रुवारी:- पुण्यातील लोणीकंद गावात सचिन शिंदे नावाच्या सराईत गुन्हेगाराची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सचिन शिंदेवर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. शिक्रापूर आणि रांजणगाव एम आय डी सी भागामध्ये त्याची मागील काही वर्षांपासून दहशत होती. काही दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता.

हवेली तालुक्यातल्या गोल्डमॅन म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या सचिन शिंदे याला लोणीकंद ग्रामपंचायत कार्यालया समोरील एटीएमसमोर गोळ्या घालण्यात आल्या. काल सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या गोळीबरात डोक्यात गोळी लागून शिंदे रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. त्याला जखमी अवस्थेत रुबी हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. सचिन शिंदे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असुन त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

ग्रामपंचायत कार्यालयातून काम करून एटीएम समोर सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना दुचाकीवरुन येत काही लोकांनी गोळीबार केला. परंतु अजूनही या घटनेचा गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, सचिन शिंदे याला गोल्डमॅन म्हणुन सुध्दा ओळखळं जात होतं. सचिन शिंदेचे मारेकरी गोळ्या घालुन दुचाकीवरून फरार झाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.