Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र पोलीस दलात जम्बो पदभरती, गृहमंत्र्यांनी 12,500 जागांसाठी केली मोठी घोषणा

‘पहिले 12500 पदांची भरती केली जाणार आहे. त्यानंतर आणखी 5000 पदे भरण्याबाबत विचार केला जाईल’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, 11 जानेवारी :  महाराष्ट्र पोलीस दलात 12500 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. या मेगा भरतीतील पहिल्या 5300 लोकांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील तीन वर्षांपासून वारंवार घोषणा करून सुद्धा भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये घंटानाद आंदोलन केले.

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर तीन टप्प्यात भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यामध्ये सुरुवातीला 12500 जागा भरल्या जाणार आहे आणि गरज पडल्यास येत्या 4 महिन्यात 20,000 जागा भरल्या जाणार, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचे ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले. तर, पहिले 12500 पदांची भरती केली जाणार आहे. त्यानंतर आणखी 5000 पदे भरण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.  गृहमंत्र्यांच्या या घोषणेमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं पदाची भरती होणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Comments are closed.