Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मंत्री विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट जप्त, गुन्हे लपवल्याचा आरोप

Get real time updates directly on you device, subscribe now.

मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. ०७ जानेवारी: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. नंतर कारवाई झाली नाही तेव्हा ते हायकोर्टात गेले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा पर्मनंट अड्रेस दिला होता. तिथल्या पोलीस स्टेशनमधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत. त्यामुळं भांगडिया कोर्टात गेले. त्यावेळी कोर्टाने पासपोर्ट ऑफिसला नोटीस काढल्या. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची माहिती आहे.

हे माझ्या विरोधातील राजकीय षडयंत्र – वडेट्टीवार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, माझ्यावर कुठल्या ही केसेस नाही. त्यावेळी माझ्यावर 4 किरकोळ राजकीय केसेस होत्या. स्पेशल ब्राँचकडून माझ्यावर कुठल्याही केसस नाही हे पत्र आहे. तेव्हा केसेस होत्या, पोलिसांनी व्हेरीफाय करायला पाहिजे होते. मी आता ओबीसींसाठी इतके करतो आहे. हे माझ्या विरोधातील राजकीय षडयंत्र आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.