Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Olympics 2024: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री

नीरज चोप्राची पहिल्याच थ्रोसह फायनलमध्ये धडक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

Paris Olympics 2024-  भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील महिला कुस्ती 50 किलो स्पर्धेत जागतिक विजेती आणि गतविजेती युई सुसाकीचा पराभव करून अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली होती. गोल्ड मेडलिस्टचा पराभव करून विनेश फोगाटने क्वाटर फायनलमध्ये एन्ट्री मारली होती. त्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने क्वाटर फायनल सामन्यात युक्रेनची खेळाडू ओक्साना लिवाच हिचा पराभव करून सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. विनेश फोगटने दमदार कामगिरी केल्याने आता भारताच्या अपेक्षा अजूनही वाढल्या आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी एकही सुवर्ण पदक आलं नाही. सर्वांना अपेक्षा आहेत गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्याकडून… अशातच पात्रता फेरीमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने 89.34 मीटर लांब भाला फेकून फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री मारली आहे. नीरज चोप्रा याने फेकलेला भाला सर्वात अव्वल ठरला. नीरजच्या पुढे कुणालाही भाला फेकता आला नाही. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने 86.59 मीटर भाला फेकून क्वालिफाय केलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या विजयानंतर आज नीरज पुन्हा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. नेहमीप्रमाणे नीरजने आजही भारतीयांना निराश केलं नाही. नीरजने 89.34 मीटर लांब भाला फेकला अन् पहिल्याच प्रयत्नात यश गाठलं. आता नीरजला आणखी मजबूत फायनलमध्ये करावी लागणार आहे. नीरजची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी 89.94 मीटरपर्यंत दूर भाला फेकण्याची आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये नीरज किती लांब भाला फेकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Comments are closed.