Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

SBI ग्राहकांना बँकेत आता फक्त ‘ही’ चार कामं करता येणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था :  कोरोना काळात सध्या बँकेत मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये काम सुरु आहे. त्यामुळे जर ग्राहकांना काही अतिमहत्त्वाचे काम असेल तरच बँकेत जा, असे आवाहन केले आहे. तसेच जेवढी शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त काम ऑनलाईन माध्यमातून करा, असा सल्ला दिला जात आहे. त्यानुसार नुकतंच बँकेने काही कामांची यादी जाहीर केली आहे. यापुढे जर ग्राहकांना ही काम असतील तरच तुम्ही बँकेत जा, असे सांगण्यात आले आहे.

SBI चं ट्वीट 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत कोरोनामुळे बँकेत मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये काम  केले जात आहे. त्यामुळे जर खाली नमूद केलेल्या कामांसाठी बँकेत जा. त्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कोणतीही तातडीची कामं असतील तरच बँकेत जाता येईल. अन्यथा तुम्हाला बँकेत जाता येणार नाही. नुकंतच याबाबतची नियमावली जारी करण्यात आली आहे.

हीचारचं काम बँकेत करता येणार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • पैसे जमा करणे आणि पैसे काढणे
  • चेक क्लियरिंग
  • पैसे ट्रान्सफर करणे (remittance) ( जर तुम्हाला एका अकाऊंटमधून दुसऱ्या अकाऊंटमध्ये किंवा परदेशात पैसे पाठवायचे असेल)
  • सरकारी व्यवहार

बँक शाखांमधील कामकाजाचा कालावधी कमी

बँक शाखांमधील कामकाजाचा कालावधी कमी झालेला आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीने यासंदर्भात बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना संक्रमणापासून बँक कर्मचारी आणि ग्राहक दोघांचीही सुरक्षा लक्षात घेता कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत अनेक ग्राहक बँकेत २ वाजेपर्यंत काम आटोपून निघून जायचे, परंतु त्यांना आता चार वाजेपर्यंत बँकेची कामं करता येणार आहे. तसेच एसबीआयनं बँकेच्या कामकाजाची वेळ वाढवल्यामुळे बँकेमध्ये होणारी गर्दीही कमी होणार आहे.

Comments are closed.