Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पर्यावरणाचे महत्व कोरोना महामारीने जगाला दाखवुन दिले – डॉ. कुणाल सोनवणे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भामरगडकोरोना या संसर्गजन्य विषाणुने जगभरात थैमान घातल्यामुळे मानवजातीला प्राणवायुचा तुटवडा होत असल्याने निसर्गाचे अनन्य साधारण महत्व जगभरात लक्षात आले आहे. पर्यावरणाशी संबधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधुन घेण्याची गरज निर्माण झाल्याने एक माणुस एक झाड लावुन पुढीलपिढीसाठी प्राणवायू किती महत्त्वाचे आहे हे आपणास कोरोना महामारी ने दाखवून दिले आहे. असे मत भामरागड उप विभागिय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवने यांनी व्यक्त केले.

त्याबाबत पोलीस स्टेशन भामरागड हद्दीतील नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याकरीता पोलीस स्टेशन भामरागड परिसरात दिनांक ०५ जून जागतिक पर्यावरणदिनी वु्क्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पर्यावरणाशी संबधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधुन घेण्याची गरज निर्माण झाल्याने एक माणुस एक झाड लावुन पुढीलपिढीसाठी प्राणवायू किती महत्त्वाचे आहे हे आपणास कोरोना महामारी ने दाखवून दिले आहे.

डॉ. कुणाल सोनवने – उप विभागिय पोलीस अधिकारी भामरगड 

सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल, सिआरपीएफ ३७ बटालीयनचे कमाडंट मोहनदास एच. खोब्रागडे, अपर पोलीस अधीक्षक अभियान मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन समीर शेख, सीआरपीएफ ३७ बटालियनचे सहाय्यक कमाडंट नितीश रामपाल यांच्या मार्गदर्शनात भामरागड उप विभागातील कोठी, ताडगाव, धोडराज, लाहेरी, नारगुंडा पोलीस मदत केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, ३७ बटालियन सहाय्यक कमाडंट नितीश रामपाल, भामरागडचे पोलीस निरीक्षक किरण रासकर, भामरागडचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण, आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.

मानव जीवन कितीही प्रगत झाले तरी ते निसर्गावर अवलंबुन आहे. निसर्गाचे संवर्धन हे आपले संवर्धन आहे तरी प्रत्येक नागरिकांनी किमान एकतरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे अनिवार्य आहे.

नितीश रामपाल – ३७ बटालीयन सहाय्यक कमाडंट 

हे देखील वाचा : 

आणि जेव्हा हत्ती सोंडेच्या सहाय्याने बोरवेलचा दांडा हलवून पाणी काढतो तेव्हा…

पर्यावरणदिनी स्वयं रक्तदाता समिती तर्फे आयोजित शिबिरात १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

मॅजिक बस फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

Comments are closed.