Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मॅजिक बस फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा, तळोधीसह विविध शाळेत वृक्ष लागवडीसोबत ओला कचरा आणि सुखा कचरा विल्हेवाट लावण्याचे तसेच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी : के. सचिनकुमार

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यात मॅजिक बस फाउंडेशनच्या वतीने आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन १० गांवामध्ये वृक्षारोपणसह विविध उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मॅजिक बस फाउंडेशनच्या तालुका समन्वयक योगिता सातपुते तसेच युवा मार्गदर्शक झीनत सैय्यद यांनी तळोधी, कुनघाडा या गावांमध्ये वृक्षारोपण करून शुभारंभ केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या देशभरात कोरोनाचा संसर्ग असल्याने विद्यार्थ्या समवेत कार्यक्रम सामाजिक अंतर राखून विविध उपक्रम राबविण्यात आले. शिवाय कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना प्राणवायूची किती गरज आहे. या  प्रादुर्भावात दिसून आले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करून संवर्धन करणे काळाची गरज असल्याने आज  चामोर्शी तालुक्यातील १० गावात रस्त्यात दुतर्फा वृक्ष लागवड करण्यावर भर देण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर वृक्ष लागवड करताना देशी व रानटी झाडांची झाडे निवडण्यात आली जेणेकरून पहिल्या पावसात चांगल्या प्रकारची जीव धरतील म्हणूनच वृक्षारोपण करताना “एक कुटुंब एक झाड” ही संकल्पना राबविण्यात आल्याने यासमोर विद्यार्थी आणि पालकात मिळून वृक्षारोपण करता येईल. जे कुटुंब जे झाड लागेल त्या झाडाला त्या कुटुंबाचे नाव देण्यात यावे जे कुटुंब आपल्या झाडाची काळजी घेत चांगल्या प्रकारे संगोपन करतील.

वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून या उपक्रमाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा उपक्रमातून वृक्षारोपणाचे काम मोठे होऊ शकेल कारण प्राणवायूची किंमत किती मोठी आणि महत्त्वाची आहे आज हे कोरोना प्रादुर्भावाने दाखवून दिले आहे. म्हणूनच विद्यार्थी आणि पालकांनी वृक्षांची संवर्धन करण्यासाठी वृक्ष बंधन हा उपक्रम राबवून शपथ घेण्यात आले.

निरुपयोगी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू  तयार करण्याच्या संकल्पना.

घरातील शीतपेयांच्या मोठ्या बाटल्या, जुन्या खराब झालेल्या सीडी, आइस्क्रिम स्टिक्स या सरसकट कचऱ्यात टाकण्यापेक्षा त्यांचा अधिक चांगला उपयोग कसा करता येईल, याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. झाडे लावण्यासाठी तुटलेल्या बादल्यांपासून सिमेंटच्या पोत्यांपर्यंत अनेक गोष्टींचा वापर शक्य आहे. त्याचबरोबर जुन्या टी-शर्ट, जीन्सपासून बॅगा बनवणे, बाटल्यांचा उपयोग करून पिशव्यांची हवाबंद झाकणे बनवणे, सुशोभनाच्या वस्तू तयार करणे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

ओला कचरा आणि सुखा कचरा याची विल्हेवाट कशी लावायला पाहिजे.

सध्या खेड्यापाड्यात ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा काढायचा प्रकार नव्यानेच चालू झाला आहे. सर्वच रहिवाशी या प्रकाराबद्दल अनभिज्ञ आहेत. म्हणजे, कुठला कचरा ओला कचर्‍यात मोडतो आणि कश्याला सुका कचरा म्हणावे याबाबत सर्वांचाच गोंधळ आहे.

जेवणाचे खरकटे ओल्या कचर्‍यात जायला हवे याबाबत कोणाचे दुमत नाही. पण बाहेरून पार्सल मागवलेल्या अन्नाच्या पिशव्या, डबे, कागदी थैल्या, दही-श्रीखंडाचे डबे, वगैरे सुक्या कचर्‍यात टाकायच्या की ओल्या कचर्‍यात जमा करायचे याबाबत लोक अजून संभ्रमात आहेत. पिशव्या आणि डबे धुवून वा पुरेसे साफ करून सुक्या कचर्‍यात टाकण्याबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली.

हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, चामोर्शी तालुक्याचे तालुका समन्वयक योगिता सातपुते व युवा मार्गदर्शक वसंत पोटे, रोशन तिवाडे, झीन्नत सैय्यद, सोनी शिउरकर व प्रफुल निरुडवार व पालक वर्ग व मॅजिक बस सत्रात सहभागी विद्यार्थी यांच्या परिश्रमाने हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करून अथक परिश्रम घेतले.

 

हे देखील वाचा :

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्टीच्या वतीने वृक्षारोपण

कोविड बाधीतांच्या नातेवाईकासाठी भाजपची नमो भोजन व्यवस्था २० दिवसापासून अविरत सुरू

दिलासादायक!! 7 जूनपासून महाराष्ट्र अनलॉक, पाच टप्प्यात हटणार लॉकडाऊन!

 

 

Comments are closed.