शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट होऊ शकत नाही परिस्थिती पाहून निर्णय घेतला पाहिजे, देवेंद्र फडणवीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती डेस्क २२ नोव्हें :- नोव्हेंबर 23 तारखेला शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट होऊ शकत नाही त्याच्या ठिकाणची परिस्थिती पाहून शाळा सुरू केले पाहिजे असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी अमरावती येथील शिक्षक मतदार संघाच्या प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना केला.
शाळा सुरू करण्याचा निर्णय गांभीर्याने केला पाहिजे सोबत सर्व शिक्षकांच्या स्टेट चा खर्च राज्य सरकारने करावा पालक मोठ्या प्रमाणात घाबरले आहेत त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
Comments are closed.