Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीत स्वातंत्र्य दिन साजरा! मुख्यचौकात सहा.जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी 15 आगष्ट: स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी  येथील मुख्य चौकात नगर पंचायतीचे प्रशासक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री अंकित यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आले. त्या नंतर ध्वजाला मानवंदना व सामूहिक राष्ट्रगीत सादर करण्यात आले.

     तसेच येथील नगर पंचायतीच्या कार्यालयात मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

     जुन्या नगर पंचायतीच्या ध्वजच्या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये सेवा निवृत्त होणारे नगर पंचायतीचे वरिष्ठ कर्मचारी सैय्यद अली सैय्यद हबीब यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आले.

    माजी नगरसेवक श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम,अमोल मुक्कावार, जावेद शेख प्रतिष्टीत व्यापारी कन्हैयालाल रोहरा, प्रमोद दोंतुलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद दोंतूलवार, सुरेंद्र अलोने, दिलीप पडगेलवार,शंकर मगडीवार, हनिफ भाई, उमेश गुप्ता, मधुकर सोनलवार, राहुल गर्गम, रमेश कस्तुरवार आदी आणि व्यापारी, पत्रकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

    

नगर पंचायतीत हरित शपथ!

     स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अहेरी नगर पंचायत कार्यालयाच्या प्रांगणात माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत हरित शपथ देण्यात आले. शपथेचे वाचन स्वछता समन्वयक प्रमोद पिलारे यांनी केले.

     तसेच ‘स्वछता संकल्प देश का, हर रविवार विशेष मा’ कार्यक्रमाद्वारे प्लास्टिक मुक्ती व निर्बंधासाठी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनजागृती करण्यात आले. यावेळी नगर पंचायतीचे माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक, नगर पंचायत कार्यालयातील कर्मचारी, प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.