Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोयाबिनपेठा येथील जि.प.शाळेत वर्ग खोलीच्या दूरुस्ती कामाचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

 सिरोंचा 15 ऑगस्ट : जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत मोयानबिनपेठा  येथे जिल्हा परिषद  शाळा असून  इयत्ता १ली ते ७ वी पर्यत शिक्षण असून  विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीची  दुरवस्था असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे   नागरिकांनी मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी सन २०२०-२१  जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या  निधी उपलब्ध  करून  दिला .   

सदर वर्ग खोलीच्या दुरुस्तीचे  भूमिपूजन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार  यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी सरपंच बेबीताई कोडापे ,उपसरपंच श्री.शंकर रत्नम,सदस्य हंनमंतु तोडसाम,संतोष जाकावार,शंकर तोडसाम,नामदेव कोडापे,राजू पुपलवार,सत्यम चिलकामारी,महेश जाकावार,स्वामी जाकावार,रमेश जाकावार,व्येंकना जाकावर,राजू पून्नावर,कोंडागुर्ला सर, आदींची उपस्थिती  होती .

हे देखील वाचा :

संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

 

लाल किल्यावरील संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले वाचा …

 

 

काबुलवर तालीबान्यांचा कब्जा

 

Comments are closed.