Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या प्रभाग रचनेच्या मसुद्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

गडचिरोली 09मार्च: जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन संजय मीणा जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नगरपरिषद, गडचिरोली व देसाईगंज येथील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती परिशिष्ट-2 व (हद्दीची व्याप्ती व वर्णन) आणि प्रभागदर्शक नकाशे निर्दिष्ट करण्याचे ठरवित असून जनतेच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुचना फलकावर, नगर परिषद, गडचिरोली व देसाईगंज तसेच तहसिल कार्यालय, गडचिरोली व देसाईगंजच्या सूचना फलकावर दिनांक 10 मार्च 2022 (गुरुवार) रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नगरपरिषद, गडचिरोली व देसाईगंज क्षेत्रातील सर्व रहिवाश्यांच्या माहितीकरीता प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या प्रभाग रचनेच्या  मसुद्यावर दिनांक 10 मार्च 2022 (गुरुवार) ते 17 मार्च 2022 (गुरुवार) पर्यंत कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. उक्त प्रभाग रचनेच्या मसुद्यास ज्या लोकांच्या काही हरकती/ सूचना असतील त्यांनी त्या पुराव्यासह संबंधित उपजिल्हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी/मुख्याधिकारी यांचेकडे दिनांक 17 मार्च 2022 (गुरुवार) रोजी किंवा तत्पुर्वी  कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती/ सूचना विचारात घेण्यात येणार नाही. विहीत कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी दिनांक 22 मार्च 2022 (मंगळवार) पर्यंत घेण्यात येईल, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी, गडचिरोली  संजय मीणा यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.