Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महिलांच्या योजना आणि सुविधांची माहिती महिलांपर्यंत पोहचवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ८ मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

महिला व बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, महिला व बालविकास सचिव श्रीमती आय ए कुंदन, यांच्यासह महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील महिला व प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्यातील सर्व महिलांना शुभेच्छा.
  • महिला सर्वच क्षेत्रात पुढे असल्याचा सार्थ अभिमान.
  • दरवर्षी महिला दिन, मातृदिन येतो. हे दिन आपण दिमाखात साजरे करतो. पण हा सन्मान सर्वकाळासाठी हवा.
  • दुय्यम स्थानाविरुद्ध महिलांनी त्या त्या काळात नेहमी आवाज उठवला. सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे टाकून काम केले.
  • महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे  काम छान. महिलांचे प्रश्न, त्याविषयीची  त्यांची तळमळ नेहमी जाणवते.
  • सर्वसमावेशक महिला धोरण तयार करण्याचे काम महिला व बाल विकास विभाग करत आहे.
  • मुंबई पोलीस आयुक्तांनी आजपासून महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे ८ तास निश्चित केले आहेत.  महिला पोलीसांना कुटुंब, घरदार याकडे लक्ष द्यावे लागते, सणवार सोडून ड्युटी करावी लागते, त्यांच्यावरही कामाचा तणाव असतो.
  • कोरोनाच्या संकट काळात,  अत्यंत कठीण परिस्थितीत महिला पोलीसांनी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस  यांनी खुप उत्तम काम केले. चिमुकल्यांना घरी ठेऊन कोरोना काळात या महिला कामावर गेल्या आहेत. त्यांना त्रिवार मानाचा मुजरा
  • महिला म्हणजे  फक्त चूल आणि मुल नाही.
  • आपण सगळे एका वयात मुल होतो, आपले संगोपन आई करत असते, समाज घडवण्याचे, संस्कार देण्याचे काम आई करते.
  • छत्रपती शिवाजी महाराज मातृभक्त होते. शिवरायांवर  जिजाऊंनी स्वराज्याचे संस्कार केले.
  • चूल आणि मुल या पलिकडे जाऊन पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत.
  • आपण त्यांना कसे सहकार्य करतो, त्यांना कसा आधार देतो हे राज्यकर्ते म्हणून पाहण्याचे आपले काम.
  • महिलांचे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचले का, त्यांच्यासाठीच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या का, आरोग्य सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का हे पाहणे आपले कर्तव्य, या सुविधा त्यांच्यासाठी आहेत हे माता भगिनींना समजून सांगण्याची गरज आहे. याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.
  • कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत, फक्त त्यांना संधी देण्याची गरज आहे.
  • तारा राणी,  राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी आपापल्या क्षेत्रात अतिशय विलक्षण काम केले. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले घाट, मंदिरे आजही आपण पहातो.
  • ताराराणी ने पराक्रमाची शर्थ करत  औरंगजेबाला झुंजवत ठेवले.
  • या सगळ्या आदिमायाच्या रुपातील माता भगिनींकडून आपण संस्कार घ्यावेत, त्या संस्कारांचे आचरण करावे
  • आज युक्रेनमध्ये महिला देशाच्या रक्षणासाठी शस्त्र हाती  घेऊन रस्त्यावर उतल्या आहेत.
  • महिलांना सुविधा देणे, त्यांच्या मागण्या पुर्ण करणे आपले कर्तव्य.
  • शासन महिला व बालविकास विभागाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

हे देखील वाचा : 

असा आहे महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना!, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन

चैनपूर्ण करण्यासाठी जे काढल्या जातं त्याच नाव आहे कर्ज…! इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान

आलापल्ली पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच स्वीकारताना रंगेहात अडकला एसीबीच्या जाळ्यात

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.