Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच स्वीकारताना रंगेहात अडकला एसीबीच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, ०८ मार्च :- पोलीस स्टेशन अहेरी अंतर्गत येत असलेल्या पोलीस चौकी आलापल्ली, येथे नेमणुकीस असलेले सहा. पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सोमजी सिडाम, (५५ ) यांनी ५,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोलीच्या पथकाने कारवाई केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे अहेरी तालुक्यातील मलमपल्ली येथील रहिवासी असून शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदार हे दिनांक ०७ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे भावाचे नावाने असलेल्या मोटार सायकलने मद्दीगुडम रोडनी जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक होवून अपघात झाला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याबाबत पो.स्टे. अहेरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याबाबत पोलीस चौकी आलापल्लीचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सोमजी सिडाम यांनी तक्रारदार यांना पोलीस चौकीमध्ये बोलावून सदर गुन्हयात तक्रारदार यांना आरोपी न करणे व मोटार सायकल परत देण्याकरीता ३०,०००/रूपये द्यावे लागतील. पैसे न दिल्यास गुन्हयात आरोपी करण्यात येईल असे सांगितले. तक्रारदार यांना पोलीस चौकी आलापल्लीचे सहा. पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सिडाम यांनी मागणी केलेली लाच रक्कम ३०,०००/- रूपये देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी ला प्र.वि, गडचिरोली येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी गोपनीयरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये आरोपी पोलीस चौकी आलापल्लीचे सहा. पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सिडाम यांनी पडताळणी दरम्यान अपघाताच्या गुन्हयात तक्रारदार यांना आरोपी न करणे व मोटार सायकल परत देण्याकरीता ३०,०००/- रूपये लाच रक्कमेची मागणी करुन तडजोडीअंती ५,०००/- रूपये लाच रक्कम आज दिनांक ०८/०३/२०२२ रोजी पोलीस चौकी आलापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली येथे स्वतः स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोलीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यावरून त्यांचे विरूध्द पो.स्टे. अहेरी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांचे मार्गदर्णनात पोलीस गायधीशकांटगार
अपर पालास अधाक्षक मधुकर गित याच मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर (अति. कार्यभार गडचिरोली) अविनाश भामरे, सफो प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पो.ना राजेश पदमगिरवार, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकुर, चापोहवा तुळशिराम नवघरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली, पो.ना. रोशन चांदेकर, चा.पो. राहुल तुमरेडी, ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी केलेली आहे.

 

 

 

Comments are closed.