Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा, उत्कृष्ट महिला बचत गटांचा व महिलांचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ८ मार्च : नाबार्ड, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक व महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा मार्गावरील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सह. बॅक मुख्य शाखा भवनात जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्यात उत्कृष्ट, उद्योजक महिला बचत गटांचा व महिलांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर (IFS) यांनी केले. अध्यक्षस्थानी नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक डॉ. प्रदिप पराते होते. प्रमुख अतिथी म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या संचालिका सुलोचना वाघरे, महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली चे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन देवतळे, पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, Day-NULM SMID गणेश नाईक तसेच सखी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्षा अश्विनी जांभूळकर, सचिव सीमा वसाके आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मान्यवरांनी उद्योजक बचत गटांनी व महिलांनी तयार केलेल्या वस्तूच्या प्रदर्शनी व विक्री स्टाल ला भेट दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर मेळाव्या प्रसंगी उत्कृष्ट, उद्योजक महिला बचत गटांचे व महिलांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये विशेषत: तेजस्विनी आदिवासी महिला बचत गटातील महिलांची मुलगी अथक परिश्रमाने पोलीस उपनिरिक्षक पदी निवड झालेल्या वर्षा नैताम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उद्योजक गट म्हणून आदर्श महिला बचत गट धानोरा चे अध्यक्षा शशिकला देशमुख व इतर सदस्य सत्कार करण्यात आला. तसेच अडपल्ली गावातील बचत गटातील उद्योजक महिला विद्या दिपक चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

सदर मेळाव्याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या सखी लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचारी व बचत गटातील जवळपास १५० उद्योजक महिला उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे संचालन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक गडचिरोलीचे कर्ज विभागचे व्यवस्थापक राजू सोरते यांनी केले. तसेच मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक गडचिरोलीचे विकास अधिकारी नंदू नाकतोडे यांनी मानले.

हे देखील वाचा :

आलापल्ली पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच स्वीकारताना रंगेहात अडकला एसीबीच्या जाळ्यात

 

Comments are closed.