Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह २८ नवीन कोरोनाबाधित तर ४१ कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

आत्तापर्यंत जिल्हयात एकूण बाधितांपैकी १० हजार कोरोनामुक्त झाले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २९ मार्च: जिल्हयात एकूण कोरोना बाधितांपैकी कोरोनामूक्त रूग्णांचा आकडा १० हजार पूर्ण झाला. आज जिल्हयात ४१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच २८ नवीन कोरोना बाधित आढळून आले. आत्तापर्यंत एकूण बाधित १०५१८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १०,००१ वर पोहचली. तसेच सद्या ४०७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ११० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन एका मृत्यूमध्ये वडसा येथील ८५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०८ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ३.८७ टक्के तर मृत्यू दर १.०५ टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

          नवीन २८ बाधितांमध्ये गडचिरोलीतील १७, अहेरी तालुक्यातील ३, आरमोरी तालुक्यातील ४, चामोर्शी तालुक्यातील १, एटापल्ली तालुक्यातील ०२, कुरखेडा तालुक्यातील ०१ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ४१ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील २४, अहेरी ४,  आरमोरी २, भामरागड ०४, धानोरा १, एटापल्ली ०१, मुलचेरा ०१, कुरखेडा ०१, तर वडसा  मधील ३ जणांचा समावेश आहे.

    नवीन २८ बाधितांमध्ये अहेरी तारलुक्यातील आलापल्ली २ तर शहरातील १ जण आहे. आरमोरी मधील ४ सर्व स्थानिक आहेत. चामोर्शी मधील एक मार्कंडा येथील आहे. एटापल्ली दोघेही स्थानिक आहेत. गडचिरोली मधील जीएनएम होस्टेल जवळ १, रोज टावर अपार्टमेंट जवळ १, गोकूळ नगर १, चामोर्शी रोड १, इतर जिल्हयातील १, प्रियांका हायस्कूल कनेरी जवळ ५, कारगील चौक १, महिला महाविद्यालय जवळ १, आनंद नगर ३, साईनगर १, पोस्ट ऑफिस जवळ १ जणांचा समावेश आहे. कुरखेडा मधील एकजण गर्नोली येथील आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.