Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मागील दोन शैक्षाणिक वर्षातील शिष्यवृत्ती अर्जाबाबत शेवटची संधी

मंजुरीसाठी महाविद्यालयांनी प्रस्ताव पुढे पाठवावेत - सहायक आयुक्त, समाजकल्याण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 16 जून :- गडचिरोली जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगरव्यावसायीक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्यांना सुचीत करण्यात येते कि, सन 2019-20 साठी रि-अप्लाय व 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील प्रवेशित अनु.जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर भरलेले शिष्यवृत्तीचे अर्ज, ज्या महाविद्यालयांनी अद्यापही या कार्यालयाकडे मंजुरी करीता सादर केलेले नाहीत, असे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज फारवर्ड करण्याची अंतीम दिनांक 30 जुन 2021 ही आहे.

वरील कालावधीत महाडिबीटी पोर्टलवरील पात्र प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी परिपुर्णरित्या तपासणी करुन विहीत वेळेत अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर न केल्यास किंवा अर्ज प्रलंबित राहिल्यास, सदर अर्ज आपोआप महाडिबीटी प्रणालीतून Auto Reject करण्यात येतील. करीता सन 2019-20 या करीता रि-अप्लाय करण्यासाठी दिनांक 30 जुन 2021 ही शेवटची संधी देण्यात येत असून, यानंतर अर्ज सादर करण्यास व महाविद्यालयांना ते मंजुर करण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही सत्र 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत त्या विद्यार्थ्यांनी तात्काळ महाविद्यालयात संपर्कसाधावा. जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.