Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रस्ता बनविण्यासाठी दिरंगाई होत असल्याने संबंधित कंत्राटदाराची नोंदणी काळ्या यादीत टाका!, शिवसेनेची मागणी

अन्यथा आंदोलन करण्याचा दिला ईशारा,

  • तहसीलदारा मार्फत राज्याचे नगर विकास मंत्रीला दिले निवेदन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी :  स्थानिक आझाद चौक ते दानशूर चौका पर्यंत रस्ता व नालीचे बांधकाम  मागील एक वर्षांपासून सुरू असून सदर रस्त्यानेच मुख्य कार्यालये, शाळा, महाविद्यालये, तहसील कार्यालय, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय व बँके करिता नागरिकांना याच रस्त्याने नेहमी ये-जा करावे लागते. परंतु कामाची कासव गती व एका बाजूने पर्याय रस्त्याचे नियोजन न केल्याने मागील आठवड्या भरापासून वाहतूक पूर्णतः बंद आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे नागरिकांची मोठी ससेहोलपट होत असून संबंधित कंत्राटदाराकडून काम काढून घेऊन संबंधित कंत्राटदारांचे नोंदणीकृत परवाना काळ्या यादीत टाकण्याची मागणी अहेरी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले असून राज्याचे नगरविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्याकडे बुधवार १७ जून रोजी अहेरीचे तहसीलदार यांच्यामार्फतीने निवेदन सोपविले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

निवेदनात नमूद केले आहे की, विद्युत खांब सुद्धा रस्त्याच्या ठिकाणी आले असून रस्ता बांधकाम करण्याच्या आधी रस्त्याच्या कडेला किंवा बाजूला विद्युत खांब स्थापित करणे गरजेचे होते. रस्ता बांधकामासाठी खाजगी जमीन अधिग्रहित करण्यात आले असून जमीन मालकांना बाजार भावा प्रमाणे मोबदला देण्याचेही मागणी निवेदनातून केले आहे.

संबंधित कंत्राटदार रस्त्याचे काम संथगतीने व मनमर्जीप्रमाणे करीत असल्याने व अहेरी नगर पंचायतीचेही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने संबंधित अधिकारीवर कार्यवाही व कंत्राटदारला देयके न देता नोंदणीकृत परवाना काळ्या यादी (ब्लॅक लिस्ट) मध्ये टाकण्याची मागणी करून सदरील काम युद्धपातळीवर करून रहदार व वाहतूक सुरळीत करण्याची तीव्र व एकमुखी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले असून तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून दिले आहे.

निवेदन देतांना शिवसेना अहेरी उपजिल्हा प्रमुख रियाज भाई शेख, अहेरी विधानसभा प्रमुख अरुण धुर्वे, संघटक बिरजू गेडाम, प्रफुल्ल येरणे, शिवसेना महिला संघटिका तुळजा तलांडे, सपना इश्वरकर, दिलीप सुरपाम, अक्षय करपे, राजू येनगंटीवार, महेश मोहूर्ले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

हे देखील वाचा :

सेना भवनसमोर राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले

रोनाल्डोचा करिष्मा; सेकंड हाफ मध्ये केलेल्या दोन गोलाच्या बळावर हंगेरीवर ३-० ने मात

कोविड-१९ लस घेण्यासाठी दुर्गम भागातील नागरिकांमध्ये व्यंकटापूर उपपोलिस स्टेशनच्या पुढाकाराने जनजागृती

 

 

Comments are closed.