Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बापरे! मुंबईत तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क ३० नोव्हेंबर :- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व विक्रेते मुंबईतील कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुंबईत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.

दिवाळीनंतर अनेक राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली, गुजरात, राजस्थान या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन जोरात कामाला लागली आहे. बाजारातील विक्रेत्यांद्वारे संक्रमण वाढू नये, यासाठी पालिकेने शोधमोहिम सुरु केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या पार्श्वभूमीवर मुंबईत दररोज 18 ते 19 हजार लोकांची आरटीपीसीआर आणि जलद चाचणी घेण्यात येत आहे. यात सर्वसामान्य नागरिक, दुकानदार, भाजीपाला, फळे आणि इतर विक्रेत्यांची जलद चाचणी केली जाते. यानुसार गेल्या चार दिवसांत मुंबईच्या विविध बाजारपेठांमध्ये सुमारे 12 हजार दुकानदार, भाजीपाला, फळे आणि इतर विक्रेत्यांची जलद चाचणी घेण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यात गेल्या पाच दिवसात 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व विक्रेते मुंबईतील कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष यात एकूण चाचण्यांपैकी सुमारे 3000 संभाव्य स्प्रेडर्सची चौकशी केली जात आहे. यामुळे मुंबईत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.