Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘थलायवा’ रजनीकांत पुढच्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क ३० नोव्हेंबर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांची सक्रियता वाढली आहे. पुढच्या वर्षी ‘थलायवा’ रजनीकांत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. सोमवारी अभिनेता रजनीकांत यांनी त्यांच्या ‘रजनी मक्कल मंद्रम’ या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2017 डिसेंबर महिन्यात रजनीकांत यांनी आपल्या राजकीय कार्यक्रमाची घोषणा केली परंतु अजून काहीच अधिकृत जाहीर झालेले नाही. 2021मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत रजनीकांत आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आजच्या बैठकीनंतर या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. रजनीकांत यांनी यासंदर्भात आपले निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, ‘ते आधी रजनी मक्कल मंद्रमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय घेतील.’

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.