Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वर्धा वाढत्या कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास पालिका असमर्थ

एकाच महिन्यात ४० लाख रुपयांपर्यंत खर्च झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागणी करूनही निधी न मिळाल्याने वर्धा पालिकेचा निर्णय

Get real time updates directly on you device, subscribe now.


लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

वर्धा डेस्क 09 मे :- वर्धा शहरात कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवरील अंत्यसंस्कारासाठी शुल्क घेण्यात येत नव्हते. पण, एकाच महिन्यात ४० लाख रुपयांपर्यंत खर्च झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागणी करूनही निधी न मिळाल्याने कोविड मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये घेण्यात येणार आहे. पालिकेने तसा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर वर्ध्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मागील वर्षभरापासून येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हजारांवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. त्याकरीता लागणारा खर्च  नागरिकांकडून घेण्यात आला नाही. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी याकरीता आपत्ती व्यवस्थापन अथवा खनिकर्मकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. निधीकरीता नगरपालिकेच्या वतीने प्रशासनाला कळविण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एक एप्रिल ते ३० एप्रिलच्या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे. दररोज एक ते सव्वा लाख रुपये खर्च होत आहे. महिन्याला हा खर्च ३० लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी वर्षभराला लागणारा खर्च आता एक महिन्याला येत आहे. राज्यात कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी खर्च घेतल्या जातो. मात्र वर्धा नगरपालिकेत घेण्यात येत नव्हते. पण, आता खर्च वाढला असल्याने आणि पालिका हा खर्च करण्यास असमर्थ असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने निधी न दिल्याने याकरीताचा खर्च घेण्यात येत आहे. वसुधा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर अंत्यसंस्काराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र निधी नसल्याने संस्थेच्या कार्यावर ताण आला आहे.

निधी न दिल्याने आता पालिका प्रशासन खर्च करण्यास असमर्थ असल्याचे सांगण्यात आले. कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नातलगांकडून २५०० रुपये घेण्यात यावे, अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कोविड मृतांच्या अंत्यसंस्काराची निशुल्क सेवा पालिकेच्या वतीने थांबविण्यता आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा

कर्मचाऱ्यांना मोफत मिळते ७ लाख रुपयांच्या ‘या’ सुविधा

चिंता मिटली! चीनचे अनियंत्रित रॉकेट हिंदी महासागरात कोसळलं

इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात ३३७ जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.