Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तुर्की आणि ग्रीसमध्ये शक्तिशाली भूकंप; २२ लोकं मृत्युमुखी, ७०० हून अधिक जखमी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

शुक्रवारी तुर्की आणि ग्रीस देश भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी हादरले. या भूकंपाची तीव्रता ६.९ होती आणि त्याचे केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर होते, असे युरोपियन-मध्यसागर भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले. आतापर्यंत या भूकंपामुळे २२ लोकं मृत्यूमुखी पडले असून ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. याचदरम्यान सौम्य प्रमाणात इस्तांबूलमधील इज्मीर जिल्ह्यातील सेफेरिसारमध्ये त्सुनामीची लाट आली. याच वेळी ४ लोकं ग्रीसच्या सामोस द्वीपकल्पात किरकोळ जखमी झाली.

अमेरिकेच्या भूगर्गीय सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ७.० असल्याचे म्हटलं जात आहे. तसंच तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एजियन समुद्रात १६.५ किलोमीटर खाली भूकंपाचे केंद्रस्थान होते. ६.६ भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भूकंपाने इझमिर (Izmir) हे शहर हादरलं आहे. या विनाशकारी भूंकपामुळे इजमिर शहरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले. शहरात सुनामीसारखी परिस्थिती निर्माण झाली. शहरांमधल्या रस्त्यांवर पाणी घुसलं असून त्याचा वेगही प्रचंड आहे. या प्रचंड वेगात घरं, गाड्या आणि इतर सामान वाहून गेलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.