Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हॉर्निमन सर्कल येथे बुल आणि कॉमन मॅन शिल्पाचे अनावरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, २७ एप्रिल २०२३ : मुंबई फोर्ट परिसरातील हॉर्निमन सर्कल येथे चार्जिंग बुल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंगचा गॉ‌ंग आणि कॉमन मॅनच्या शिल्पाचे महाराष्ट्र सरकारचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि महिला व बाल विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या समारंभाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंग चे चेअरमेन एस एस मुंद्रा, मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मनपा अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा हे देखिल उपस्थित होते.

चार्जिंग बुल” हे शेअर बाजाराचे प्रतिष्ठित प्रतीक आहे. जे भारतीय शेअर बाजाराचे समृद्धीचे प्रतीक आहे आणि आर्थिक आशावाद देखील दर्शविते आणि या प्रमुख स्थानावरील बुलचे शिल्प सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक समृद्धीची सुलभता दर्शवितो. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी तयार केलेले “सामान्य माणूस”, हे व्यंगचित्र सामान्य माणसाच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतीक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंग च्या समृद्ध प्रवासातील महत्वाचा दिवस म्हणून मानला जाईल कारण आज आपला प्रसिद्ध चार्जिंग बुल सर्वसामन्यांपर्यंत पोहचत आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज चा चार्जिंग बुल आणि गॉ‌ंगची प्रतिकृती सार्वजनिक रिंगणात ‘कॉमन मॅन’ सोबत ठेवून आमचा वारसा अधिक बळकट केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगर पालिकेचे अत्यंत आभारी आहोत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना आर्थिक बाजारपेठांशी संबंध ठेवण्याची संधी मिळते. अशी भावना बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री सुंदररामन राममूर्ती यांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

2 मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्ह्यात 144 कलम लागू

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.