डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला.
- मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि कमला हॅरीस यांचे केले अभिनंदन!
- डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत. पेनसिल्वेनिया मधील मतमोजणी अखेर संपली आणि जो बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
- ‘मी देशाला तोडणारा नाही तर जोडणारा राष्ट्रपती’ विजयानंतर बायडन यांची पहिली प्रतिक्रिया.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. जो बायडेन यांना अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जाहीर करण्यात आलं आहे.डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होणार आहेत. पेनसिल्वेनियामधील मतमोजणी अखेर संपली आणि जो बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
विजयानंतर आपले गृह राज्य डेलावेयरमधील विलमिंगटनमध्ये संबोधित करताना बायडन यांनी हा विजय ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, 7.4 कोटींहून अधिक अमेरिकन लोकांनी मला मतं दिली आहेत. ते म्हणाले की, मी राष्ट्रपती म्हणून ब्लू किंवा रेड स्टेट असं न पाहता यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका असं राष्ट्राकडे पाहील.
अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन हे निवडून आलेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. ‘भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेलं योगदान कौतुकास्पद होतं. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करण्यात आनंद होईल’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
Comments are closed.