दिवाळीपूर्वीच सोण्याच्या किंमती वेगाने वाढू लागल्या दिवाळीच्या आठवड्यात इतका आहे सोन्याचा दर, जाणून घ्या!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क : दिवाळी पूर्वीच सोन्याच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत.तर चांदीचे प्रती १० ग्राम ₹ ६५.४१ आज आहे .त्यामुळे दिवाळीच्या आठवड्यात तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. MCX सोन्याचा डिसेंबर मधील दर ५२ हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये आणखी घट होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. सोन्याच्या किमतीत दिवाळीच्या आठवड्यात सोनं प्रति १० ग्रॅम ५३ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते हे स्पष्ट झालंय.
प्राप्त झालेल्या ब्रोकर पोलनुसार, दिवाळीच्या आठवड्यात सोन्याची किंमत ५१ हजार ५०० ते ५२ हजार ५०० च्या दरम्यान असू शकते असे ४० टक्के दलालांचे मत आहे. तर ६० टक्के दलालांच्या म्हणण्यानुसार ५२ हजार २०० ते ५३ हजार रुपये प्रति ग्रॅम पर्यंत सोनं असेल.
Comments are closed.