भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. 4 जवान शहीद, 2 दहशतवाद्यांचा खात्मा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
श्रीनगर डेस्क, दि. ८ नोव्हेंबर: भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा मोठा डाव भारताने रविवारी उधळून लावला. नियंत्रण रेषेवर झालेल्या कारवाईत एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले. तर 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आलं. कुपवाडा जिल्ह्यातल्या मचिल क्षेत्रात हा हल्ला झाला. हिवाळा सुरू होण्याच्या आधी भारतात सीमेवरच्या चोरवाटांनी दहशतवाद्यांना घुसवण्याचा पाकिस्तानचा डाव असतो. लष्कराच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला मात्र त्यात 4 जवांना वीर मरण पत्करावं लागलं.
काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलं आक्रमक झाली असून दहशदवाद्यांविरुद्ध धडक कारवाई करत आहेत.
जम्मू आणि काश्मीरमधलं वादग्रस्त 370 कलम हटवल्यानंतर सुरक्षा दलं आक्रमक झाली आहे. वर्षभरापूर्वी 5 ऑगस्ट 2019 ला हे कलम हटविण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यात कशी परिस्थिती असेल अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र काही महिन्यांचा अपवाद वगळता राज्यात शांतता निर्माण करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. तर दहशतवाद्यांविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका घेतली असून गेल्या 11 महिन्यांमध्ये केलेल्या कारवाईत तब्बल 200 दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी रविवारी दिली.
रविवारी (01 नोव्हेंबर) झालेल्या चकमकीत हिज्जबुल मुदाहीद्दीनचा नंबर वन कमांडर डॉ. सैफुल्ला हा मारला गेला. तो ऑक्टोबर 2014 पासून राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. दहशतवाद्यांचा मारला गेलेला पोस्टर बॉय बुऱ्हाण वाणी याच्यासोबतही त्याने काम केलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून सुरक्ष दलं सैफुल्लाच्या मागावर होती.
श्रीनगरजवळच्या रंग्रेट भागात हा दहशतवादी आला असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तो लपलेल्या घराला वेढा दिला. त्यानंतर कारवाईला सुरूवात झाली. पोलिसांनी त्याला शरण येण्याचं आवाहन दिलं. मात्र तो शरण आला नाही. त्याने गोळीबार सुरू केला.
Comments are closed.