Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आणखी ३ राफेल लढाऊ विमानं फ्रान्समधून 8 तास प्रवास करून जामनगर येथे दाखल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

4 नोव्हेंबरला भारतीय हवाई दलात आणखी तीन राफेल लढाऊ विमानं सामील झाले .पूर्व लडाखमध्ये चीनशी झालेल्या सीमा वादानंतर आजा राफेल विमानांची दुसरा फेरी बुधवारी रात्री भारतात दाखल झाली आहे. यामध्ये 3 राफेल विमानं दाखल झाली आहेत. ही तीन विमाने थेट फ्रान्समधून भारतात आली आहेत. यामुळे आता सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाची ताकद अजून वाढणार आहे. ही विमान भारतात दाखल झाल्याचा व्हीडिओदेखील समोर आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

3 राफेल विमान भारतात दाखल होताना रस्त्यात कुठेच इंधन भरणार नाहीत, अशी माहिती भारतीय वायू दलातील अधिकाऱ्यांनी दिली होती. आता ही विमानं जामनगरमध्ये एक दिवस मुक्काम करतील. त्यानंतर ती अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहेत. महिनाभरापूर्वी भारतीय वायूसेनेची एक टीम फ्रान्समध्ये या विमानांची समिक्षा करण्यासाठी फ्रान्सला गेली होती.

फ्रान्स आणि भारतात एकूण 36 राफेल विमानांचा करार झाला आहे. यातील 5 राफेल विमानं 29 जुलैला अंबाला एअरबेसवर दाखल झाली होती. त्यानंतर 10 सप्टेंबरला त्यासंबंधी औपचारिक कार्यक्रम घेण्यात आला. फ्रान्सने भारताला दर 2 महिन्यात 3 ते 4 राफेल विमान देण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार 36 राफेल विमान भारतीय वायूसेनेची ताकद वाढवणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.