Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तुकडोजी महाराजांना आज मौन श्रद्धांजली, आकर्षत फुलांनी सजली महासमाधी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

अमरावती, दि. ०५ नोव्हें: राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव सध्या अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत सुरू आहे आज दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुदेव भक्त हे दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करणार आहे.दरवर्षी या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला देश विदेशातून लाखो गुरुदेव भक्त येत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत मौन श्रद्धांजली ही वाहिली जाणार आहे.या पुण्यतिथी महोत्सवासाठी तुकडोजी महारांची महासमाधी ही रंगेबेरंगी आकर्षक अशा पाच क्विंटल फुलांनी सजवण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरवर्षी या महोत्सवात तुकडोजी महाराजां बरोबरच देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते.सोबतच यावर्षी कोरोना काळात सेवा देताना म्रुत्यु झालेल्या हजारो कोरोना योद्धांना देखील यावर्षी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे..दरम्यान गुरुदेव भक्तांनी गर्दी करू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने गुरुकुंज मोझरीत शेकडो पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठीक ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

Comments are closed.