Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…अखेर अपघातात जखमी पोलीस जवानाची उपचारादरम्यान नवव्या दिवशी प्राणज्योत मालवली…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

चामोर्शी दि. २२ एप्रिल: आष्टी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस जवान गजानन ठाकूर वय (३६) वर्ष अपघातात १२ एप्रिल च्या मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान गोंडपीपरी कडून येणाऱ्या मिनी ट्रॅक ने समोरा समोर ब्यारिकेट ला धडक दिली. यात बाजूला असल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यावेळी लगेच उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले त्याठिकाणी जखमी जवानावर उपचार सुरु होता. मात्र प्रकुर्ती अचानक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरु असताना आज नवव्या दिवशी उपचाराला प्रतिसाद देणे बंद केल्याने त्यांची अखेर प्राणज्योत मालवली.

आष्टी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस जवान गजानन ठाकूर यांच्या निधनाची माहिती मिळताच सर्वत्र  शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा बराच आप्त परिवार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.