Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीक नको पण कुत्रा आवर, अशी आजची परिस्थिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

विशेष लेख : मोहन पाटील

नाशिक येथील झाकीर रुग्णालयात, ऑक्सिजन गळती होऊन, व्हेंटिलेटरवर असलेले २४ रुग्ण दगावले. हृदय पिळवटणारा मातम आपण पाहिला. (कोविड बाधित व्हेंटिलेटर वरील ९०% पेशंट्स वाचण्याची शक्यता नसते, असे तज्ञांचे मत आहे.) परंतु ते O2 अभावी जावेत हे अत्यंत दुर्दैवी आहे.

           द्रवरूप ऑक्सिजनची वाहतूक टँकर्स द्वारे केली जाते. व ते हॉस्पिटल्स ने बसविलेल्या O2 काँसंट्रेटर युनिट द्वारे, हे डायल्युट, प्युरीफाईड ऑक्सिजन, सेंट्ररलाईज पुरवठा व्यवस्थेतून, पाईपा द्वारे रुग्णांना पुरवले जाते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टँकर मधील O2 काँसंट्रेटर बाटल्यात रिफिल करतांना, तांत्रिक चुकीने हा अपघात घडला. (ऑक्सिजनला प्राणवायू का म्हणतात, तेही आपल्या ध्यानात आले)

या घटनेतून काही मुद्दे समोर आले:-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

* ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यावर, डॉक्टर्स-नर्सेस यांनी रुग्णांना जगवण्यासाठी , छातीवर दाब देऊन, CPR (कार्डियक रिससीटेशन) करून, कसे शर्थीचे प्रयत्न केले, ते जगाने पाहिले.

 दुर्दैवाने ऑक्सि सप्लाय पूर्ववत व्हायला विलंब झाल्याने तेही शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले.

* आणि सुरू झाले अपघात स्थळी पुढाऱ्यांचे तांडे. ज्यात पालक मंत्री, विरोधी पक्षनेते, आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी, आमदार,खासदार, बहुतेकांनी TV वर चमकत, बाईट्सचा ही सोस भागवून घेतला. हे करतांना कोविड च्या आचारसंहितेचेही भान राखले गेले नाही. सर्वच उद्विग्न करणारे होते.

* पत्रकार खुलेआम वार्डावार्डात खुलेआम फिरून, TRP  करिता, हा मृत्यूचा तांडव दाखवीत होते. आरोग्य आणीबाणी असताना हे प्रकार कोणत्या आचारसंहितेत बसतात ?

डॉक्टर्स आणि आरोग्य रक्षकांवरील वाढलेले हल्ले

* एकाच कुटुंबातील पाच जणांची टेस्ट केल्यावर, त्यापैकी एकाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह का आला, म्हणून त्याने डॉक्टर वरच हल्ला चढवला.

* एकाने बांबूने डॉक्टरला मारहाण केली.

* एका माथेफिरूने तर चक्क चाकूनेच वार केले.

गेले वर्ष दिडवर्षं ,रात्रीचा दिवस करीत,जीवर उदार होत, रूग्णांना जीवनदान देण्याचे महत्कार्य करणाऱ्या, या देवदूताना संरक्षण पुरवण्यात,सरकारने यापुढे कोणतीही ढिलाई करू नये. त्यांना पूर्ण संरक्षण द्यावे. या जीवरक्षकांनी असहकार पुकारल्यास हाहाकार माजेल, हे ध्यानात घ्यावे.

लसीच्या कुरघोडीचे डोस

        सिरम च्या पुनवाला यांनी,कोविशील्ड विक्रीचे शासना करिता प्रतिडोस ४०० रुपये व खासगी इस्पितळांना ६०० रु प्रमाणे दरनिश्चती जाहीर केली. त्यामुळे राज्याला खरेदीचा मार्ग (केंद्राने अडवला नाही तर) मोकळा झाला आहे. आजही ठाणे,मुंबई पासून अवघ्या महाराष्ट्रात, लसी अभावी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. (लस उत्पादनांत जगांत अग्रेसर देशात असे का व्हावे ?) केंद्र आणि राज्ये मात्र वेगवेगळे दावे करीत आहेत.

* सिरमची कोविशील्ड दर निश्चिती झाल्यावर विक्रीस खुली झाली असल्यास, राज्य हवी तेवढी खरेदी का करीत नाही?

की राज्यांना गरजे प्रमाणे खरेदीस केंद्र परवानगी देत नाही ??

* केंद्र जाणीवपूर्वक अडवणूक करीत असल्यास,त्याविरुद्ध राज्य याचिकेद्वारे सुप्रीमकोर्टात न्याय का मागत नाही ?

* कोवॅक्सीन आणि कोविशील्ड चा देशात पुरेसा साठा नसल्यास, राज्य बाहेरून लशींची आयात का करीत नाही? आयाती करिता केंद्र परवानगी का देत नसावे? की राज्य तशी मागणीच करीत नाही?

* केंद्र सरकार खरोखरच नाहक नाडवणूक आणि विरोधासाठी विरोध करीत असल्यास, घटनेच्या चौकटीत राहून, जीवितांच्या रक्षणासाठी , राज्य सरकारने सविनय कायदेभंग करून, राज्यात उत्पादित होणारा,सिरमचा साठा बळजबरीने विकत घ्यावा,व पुढील 100 दिवसात संपूर्ण राज्याचे लसीकरण करून दाखवावे. आणि सवतीचा न्याय लावणाऱ्या केंद्राचे दात घशात घालावेत. धर्मासाठी अधर्म करण्याची हीच ती वेळ आहे.

मा अमित शहा आणि प्रधानसेवक मोदींजींचा आदेश धुडकावून महाराष्ट्राने लॉकडाऊन लावलाच ना ? मग वाट कसली बघताय? सार्वजनिक हितासाठी आणि जीवितांच्या रक्षणासाठी थोडी अंगधटाई केली म्हणून आपली मानवतावादी घटना कुणाला फासावर देईल, असे मला वाटत नाही.       

  पुरोगामी महाराष्ट्राला जनहितार्थ आपली ताकद दाखवण्याची हीच ती वेळ आहे.

लेखक –

मोहन पाटील, साहित्यिक

Comments are closed.