Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठी सिनेमा आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहांचे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देणार – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. ७ नोव्हें : काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी सिनेमा पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी सिनेमांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी सिनेमांचे आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहांचे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फ्लिम मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोप सत्रात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सहसंचालिका आंचल गोयल, यांच्यासह अशोक राणे, नानू जयसिंघानी, वर्षा उसगावकर, अमित भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महसूल मंत्री श्री थोरात म्हणाले की, आज मराठी सिनेमा गावागावात पोहोचणे आवश्यक असून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन माध्यमाचा वापर करून अशा वेगळ्या पद्धतीचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले याचा आनंद होत आहे. तीन दिवस सादर करण्यात आलेल्या चर्चासत्रात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रासाठी धोरण ठरत असताना या सगळ्या बाबींचा विचार करून एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा राज्य शासन प्रयत्न करणार आहे. चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी या विषयातील तज्ञांकडून ठोस सूचना मिळतील असा विश्वास श्री. थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठी सिनेमा, कला,नाट्य आणि साहित्य क्षेत्र प्रचंड समृद्ध आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमाबरोबर आज मराठी सिनेमा स्पर्धा करीत असतो. मराठी सिनेमा निर्मिती, दिग्दर्शित करणारे खूप प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून अनेक संकटांना सामोरे जाऊन वेगळी कलाकृती तयार करण्याचे धाडस दाखवतात याचा आनंद वाटतो. येत्या काळातही आपल्या सगळ्यांनी वेगवेगळ्या कलाकृती निर्माण कराव्यात, याकरिता महाविकास आघाडीचे शासन आपल्या पाठीशी आहे, असेही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कला क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या आल्या तरी सांस्कृतिक कार्य विभाग या क्षेत्राला उभारी देण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घेत आहे आणि यापुढेही घेत राहील. कला क्षेत्रातील सर्वच दिग्गजांना शासन जलद गतीने सर्वतोपरी मदत करेल असा व्यक्त केला आहे.येत्या काळात महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र राज्यातील सांस्कृतिक क्षेत्रांतील साऱ्या कलांना कसा वाव देत येईल, मराठी चित्रपट,नाट्य,मनोरंजन लोककला इत्यादी यांचे भवितव्य कसे उजवल करता येईल यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहणार आहे. महाराष्टातील सांस्कृतिक कलांचे भवितव्य कसे असेल यासाठी या चर्चासत्राच्या माध्यमातून एक ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आगामी काळात मनोरंजन क्षेत्रासाठी परिपूर्ण धोरण तयार करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जन्मस्थान असून चित्रपट व करमणूक माध्यमांच्या क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिले आहे.या अनुषंगाने प्रस्तावित चित्रपट, मनोरंजन व माध्यम धोरण असावे या मुख्य उद्देशातूनच तीन दिवस चालणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.तरी
आज संपन्न होणाऱ्या चर्चासत्रातून येणाऱ्या सूचनांच्या आधारे येणाऱ्या काळात या कला क्षेत्राला चांगला आकार देण्याचा प्रयत्न राहील.महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा यांनी या चर्चा सत्रानंतर सूचनांच्या आधारे प्राप्त झालेल्या धोरणाबाबतचा मसुदा तयार करावा.हा मसुदाबमहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर मांडून, चर्चा करून त्यांच्या अंतिम सूचनांसह या क्षेत्राला उभारी देऊ असा विश्वास श्री.देशमुख यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.