Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आता यूपीआय पेमेंट सर्व्हिसेसमध्ये होणार मोठा बदल – पहा सर्वसामान्य ग्राहकांवर काय परिणाम होतील ?

आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अधिकृत केले आहे की 1 जानेवारी, 2021 पासून एक नवीन कॅप लागू होणार आहे.

यानुसार कोणताही थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सचा म्हणजे यूपीआयच्या ट्रांजॅक्शनमधील वाटा 30% पेक्षा जास्त नसावा असे सांगण्यात आले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिल्ली, वृत्तसंस्था दि. ०७ नोव्हेंबर:

पहा याचे काय परिणाम होणार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  • NPCI ने दिलेल्या माहिती प्रमाणे सध्या यूपीआय म्हणजेच फोनपे, गूगल पे तसेच अमेझॉन पे सारख्या Apps मुळे खूप ट्रांजॅक्शन होत आहेत.
  • सप्टेंबरच्या महिन्यात यूपीआय मार्फत 180 कोटी ट्रांजॅक्शन्स झाली – ज्यांची एकूण किंमत 3.29 लाख कोटी रुपये इतकी आहे.
  • तसेच सध्या आक्टोबरमध्ये सुद्धा यूपीआय ट्रांजॅक्शन्सचे 40% इतके शेअर आहेत – मात्र NPCI ने सांगितले येत्या 1 जानेवारी पासून यूपीआय वाटा 30% पेक्षा जास्त नसावा –
  •  या नवीन कॅप मुळे सर्वाधिक तोटा फोनपे आणि गूगल पे या दोन अप्स ला बसणार आहे – कारण सध्या या दोन कंपनीचे यूपीआय ट्रांजॅक्शन्स –
  • एकूण यूपीआय व्यवहाराच्या जवळपास 40% इतके आहे – त्यानुसार या कंपन्या अनेक बदल करतील ज्याचा ग्राहकांवर थेट परिणाम होतील.
  • कंपन्या या धोरणांना पाळण्यासाठी ट्रांजॅक्शन्सच्या शेअर नुसार साइन अप लिमिट करू शकतात – किंवा व्यक्ती ते व्यक्ती ट्रांजॅक्शन्स लिमिट सुद्धा करू शकतात.
  • दरम्यान NPCI ने दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी, 2021 पासून यूपीआय ट्रांजॅक्शनसाठी नवीन कॅप लागू होणार- तशी याविषयी आणखी काही माहिती आली कि ती आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू.
  • फोनपे, गूगल पे तसेच नव्याने व्हाट्सअप पे – वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे.

Comments are closed.