रानडुक्कराच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील वनोजा (देवी) येथिल घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सद्या पावसाळा सुरु झाला असुन जंगली प्राण्यांनी आपले बिळ तयार केले असुन तसेच झाडा झुडुपाचा सहारा घेत ते स्व:तासह पिल्लांचा पाण्यापासून बचावा करतात. अशात जर एकादा ईसम त्या प्राण्याजवळ गेल्यास ते प्राणी मनुष्यावर हल्ला करतात. अशीच एक घटना मारेगाव तालुक्यातील वनोजा (देवी) येथील शेतशिवारात घडली आहे.
शेतीमध्ये काम करत असतांना रानडुकराने हल्ला करून ऐका ३० वर्षीय तरुणाला जखमी केले आहे. हनुमान चिंधुजी आस्वले असे रान डुकराच्या हल्ल्यात गंभिर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दररोज प्रमाणे आजही हनुमान शेतामध्ये काम करण्यास गेला व भर दिवसा शेतात काम करीत असतांना अचानक जंगली डुक्कराने त्याच्या अंगावर हल्ला केला.
करुन काही कळायच्या आत हनुमानला गंभिर जखमी केले आहे. जखमीची हालत गंभीर असल्याने प्रथम त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
वाहणाऱ्या वृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ करण्यात मग्न; शेवटी नाल्यात वाहून दुर्दैवी मृत्यू
नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी ई-गव्हर्नन्स आधारित कार्यपद्धती वापरावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments are closed.