Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘लोकराज्य’ मासिकाचा जून महिन्याचा ‘समृध्द शेती’ कृषी विशेषांक प्रकाशित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. १४ जून : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा जून महिन्याचा ‘समृध्द शेती’ कृषी विशेषांक प्रकाशित झाला आहे. खरीप हंगामाचे औचित्य साधून खरीप हंगामासाठी राज्य शासनाने केलेली तयारी, शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध योजनांच्या माहितीचा प्रामुख्याने समावेश या अंकात करण्यात आला आहे.

  ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पादन वाढवून आर्थिक उन्नती साधली आहे, अशा निवडक शेतकऱ्यांच्या यशकथा हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर कृषी अवजारे, कृषी पर्यटन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या कार्याची ओळख, कोविड-19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, शिवभोजन थाळीची सार्थकता, महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय आदींचा  या विशेषांकात समावेश करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा अंक https://mahasamvad.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन मोफत उपलब्ध आहे.

हे देखील वाचा  :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी ई-गव्हर्नन्स आधारित कार्यपद्धती वापरावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गोसेखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी आंतरराज्यसह सर्व यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पुर्ण होईल – मंत्री उदय सामंत

 

Comments are closed.