Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनविभागाद्वारे हेतुपुरस्पर मानहाणी करण्याचा प्रयत्न – संतोष ताटीकोंडावार यांची तक्रार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रा हद्दीत अवैध पद्धतीने होत असलेले गौण उत्खनन व वृक्षतोड संबंधी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय गडचिरोली यांचेकडे रितसर चौकशीची मागणी करुन संबंधितांवर कार्यवाही करण्याची तक्रारवजा विनंती केली असता तक्रारीचा विपरीत अर्थ काढून वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी हेतुपूरस्पर मानहाणी करण्याचा तसेच समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे.

यासंदर्भात रेपनपल्ली पोलिस ठाण्याचे उपपोलिस निरीक्षक यांचेकडे तक्रारही दाखल केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ताटीकोंडावार यांनी २६ मे रोजी वनविभाग सिरोंचा अंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र कमलापूर परिक्षेत्रात अवैध पद्धतीने गौण खनिज उत्खनन व वृक्षतोड होत असल्याने वनपरिक्षेत्र कमलापूर यांचे शासकीय कामात बेजबाबदारपणा सुरु असल्याबाबत गडचिरोली प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक यांचेकडे अर्ज करुन संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

मात्र संबंधित तक्रारीचा विपरीत अर्थ काढून ७ जुलै रोजी वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी (सिरोंचा उपवनसंरक्षक सुमीत कुमार, अहेरी उपविभागीय वन अधिकारी एस. एस. पवार, कमलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी घुगे) यांनी माझे नावाचा संदर्भात संबंधित लोकांना नोटीसा पाठविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यामुळे कमलापूर येथील नागरीक माझ्या तक्रारीचा चुकीचा अर्थ काढून मी त्यांचे नाव दिले असल्याने त्यांचेवर कार्यवाही होत आहे, असे समजून कमलापूर परिसरासह अहेरी उपविभागात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

या नोटीसचा आधार घेऊन माझी समाजात असलेली प्रतिष्ठा नेस्तनाबुत करण्याचा प्रकार उपविभागीय क्षेत्रात घडत आहे. भविष्यात मला व माझ्या परिवारावर हल्ले करुन जिवीत हाणी वा गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याबाबत रितसर चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी ताटीकोंडावार यांनी रेपनपल्ली उपपोलिस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.

हे देखील वाचा :

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

देशात सध्या ‘खुर्ची’ साठी किळसवाणा प्रकार सुरु

मोठी बातमी : अल-कायदा संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक; उत्तर प्रदेशमध्ये एटीएसची मोठी कारवाई

Comments are closed.