Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोकस्पर्शचा दणका : अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. राठोड निलंबित

वनसंरक्षक डॉ. मानकर यांची कारवाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : एटापल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. राठोड यांच्या मनमानीपणे लाखो रुपयांची लूट केल्याच्या संदर्भात लोकस्पर्श न्यूज ने सर्वात आधी रविवारी दि. ११ जुलै २०२१ रोजी वृत्त प्रकाशित केले होते.  तसेच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करून वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती.

या प्रकरणात भामरागड वनविभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाद्वारा तपासणी केल्यानंतर गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक (प्रादे.) यांच्याकडे निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रकरणाची नोंद घेत गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. राठोड यांनी एटापल्ली चे वनरक्षक, वनपाल यांची एलआयसी रक्कम व पतसंस्थेत पाठविल्या जाणाऱ्या रक्कमेपेक्षा अधिकचे पैसे कपात करून शासकीय व्यवहारात अनियमितता, भ्रष्टाचार केले आहेत. रात्री अपरात्री काही वनरक्षकांना सोबत घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी गस्ती वरून जाऊन बांडे नदीवर जाऊन अवैधरेती ट्रक्टर पकडून सोडण्यासाठी स्वतः रक्कम वसूल करतात व वसुली करून रक्कमासह वापस आणण्यास तोंडी आदेश देतात.

संबंधित बातमी :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

 

या प्रकरणामुळे तेजावत सारखे वनरक्षक ACB च्या जाळ्यात अडकले. अशा प्रकारे वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी इतरही शासकीय कामात अनियमितता दाखवली आहे.

हे देखील वाचा  :

गडचिरोली जिल्ह्यात आज 11 कोरोनामुक्त तर 7 नवीन कोरोना बाधित

गोंडवाना विद्यापीठ व माखनलाल चतुर्वेदी विश्वविद्यालय भोपाळ यांच्यात सामंजस्य करार

आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु; 966 आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.