Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कर्जे योजनेचा लाभ घ्यावा: जिल्हा व्यवस्थापक‍ यांचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 22 जुलै : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध योजना उपलब्ध असून या योजनेचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक‍ यांनी केले आहेत. योजना पुढीलप्रमाणे आहेत.

थेट कर्ज योजना 1 लाखापर्यंत : या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता, लघु उदयोग सुरु करण्यासाठी 1 लाखाची बिन व्याजी थेट कर्ज योजना सुरु केली आहे. सदर योजनेत नियमित परतफेड न करणा-या लाभार्थींना द.सा.द.से 4 टक्के व्याज आकारण्यात येईल.व कर्ज परतफेडीची मुदत 4 वर्ष असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

20 % बिजभांडवल योजना 5 लाखापर्यंत : या योजनेंतर्गत कमाल मर्यादा रु. 5 लाखा पर्यंतचे प्रकल्पास मंजुरी देण्यात येते.‍ कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतुक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय तसेच पारंपारीक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपुर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजुर कर्ज रक्कमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर 6 टक्के व्याज दर असुन बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याज दर लागु राहील. कर्जाची परतफेड 5 वर्षात करायची आहे.

वैय्यक्तीक कर्ज व्याज परतावा योजना  10 लाखापर्यंत : या योजनेचे स्वरुप बँकेने रु. 10 लाख पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजुर केलेल्या अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपुर्णपणे संगणकीकृत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गट कर्ज व्याज परतावा योजना 10.00 ते 50 लाखापर्यंत :- या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषानुसार  विहीत केलेल्या वार्षीक उत्पन्न मर्यादेतील उमेदवाराच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), (LLP,FPO) अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थाना बँके तर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडुन अदा केला जाईल. या योजनेचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे.

नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादेत असलेल्या उमेदवारांच्या गटांकरीता असणार आहे. बँकेकडुन प्रत्येक गटात कमीत कमी रुपये 10 लक्ष ते जास्तीत जास्त रुपये 50 लक्षपर्यंतच्या मंजुर उद्योग उभारणी करीता आहे. मंजुर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल ते कर्ज मंजुर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्त्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराच्या आणि रुपये 15 लाखाच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसुल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल.इतर कोणतेही शुल्क, देयके अदा करणार नाही.

       इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट दयावी तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय. मागे गडचिरोली येथे संपर्क साधावा.

हे देखील वाचा :

मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पिपली बुर्गी व प्रा.आ. केंद्र कसनसुरला दिली भेट

धानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण

गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.