Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पिपली बुर्गी व प्रा.आ. केंद्र कसनसुरला दिली भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 22  जुलै :  मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पिपली-बुर्गी कसनसुर येथील आरोग्य केंद्रांना भेट देऊन आरोग्य विषयक समस्या जाणुन घेतल्या. पिपली बुर्गी येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्या कामाला भेट देऊन कामाची पाहणी केली.

सदर बांधकामाबद्दल समाधान व्यक्त करुन सर्व बांधकाम लवकरात लवकर गुणवत्तेने पुर्ण करण्यात यावे याबाबत निर्देश देण्यात आले. त्यानंतर त्यांनी गावातील सरपंच व गावकऱ्यांशी चर्चा करुन गावामध्ये असलेल्या समस्या बाबत सविस्तर चर्चा केली. आरोग्य विषयक असणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय करण्यात येतील असे सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मानेवारा, भद्री या उपकेंद्राचा आढावा घेताना माहे जुलै व ऑगस्ट महिण्यामध्ये प्रसूती होणाऱ्या मातेची माहिती जाणुन घेतली व त्यांची संस्था प्रसूती करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर नदी ओलांडुन शेवारी मार्ग प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसुर येथे भेट देण्यात आली. तेथे बालमुत्यू , रक्तक्षयीत गरोदर मातेला देण्यात येणारे आर्यन सुक्रोज, IDCT ( विशेष अतिसार सनियंत्रण पंधरवाडा ) हत्तीरोग गोळया वाटप कार्यक्रम, संपर्क तुटणाऱ्या गावातील गरोदर माता यांचा पाठपुरावा घेणे व संस्था प्रसुती करणे. हिवताप रुग्णांमध्ये सध्या वाढ होत आहे तेव्हा लवकरात लवकर त्यावर उपाय योजना करणेबाबत निर्देश देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सोबत डॉ. विनोद म्हशाखेत्री, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी हे उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

धानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण

मोठी बातमी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षांनी नाशिकचा सुपुत्र झाला बॅरिस्टर

नशीब बलवत्तर म्हणून पुराच्या पाण्यात युवक वाहून सुद्धा बचावला थोडक्यात!

 

Comments are closed.