Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नशीब बलवत्तर म्हणून पुराच्या पाण्यात युवक वाहून सुद्धा बचावला थोडक्यात!

मद्यपान करून नाला ओलांडणे पडले महागात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

यवतमाळ : जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. सदर पावसाने नदी-नाले ओसंडून वाहत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, पुसद उमरखेड या परिसरात रात्री दरम्यान जोरदार पाऊस झाला आहे.

दरम्यान उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील नाल्यावरून पाणी वाहत होते. यावेळी कुपटी येथील विजय येतूलवाड हा तरुण एक इसमा सोबत नाला पार करत होता. विजय हा मद्यपान करून असल्याचे समजते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तसेच रस्त्याचा अंदाज न लागल्यामुळे विजयचा तोल गेला आणि तो पाण्यात वाहून गेला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाहत असताना विजयने एका झाडाला पकडुन त्यावर आश्रय घेतला. स्थानिक गावकरी तसेच प्रशासनाच्या मदतीने विजयला झाडावरून सुखरूप काढण्यात यश आले आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांनी दिली आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरजागड प्रकल्पाला मदत करणाऱ्या “त्या” बड्या लोकांना नक्षल्यांचा पत्रकातून निर्वाणीचा इशारा..

डाॅक्टरांच्या ढेपाळवृत्तीमुळे कांग्रेस अध्यक्षांचा दुर्दैवी मृत्यू!

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती

Comments are closed.