Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डाॅक्टरांच्या ढेपाळवृत्तीमुळे कांग्रेस अध्यक्षांचा दुर्दैवी मृत्यू!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. २१ जुलै :  रुग्णांना वेळीच उपचार मिळावा आणि त्याचे जीव वाचावे म्हणून शासनाने लाखो रुपयांचे अत्याधुनिक यंत्रसामग्री रुग्णालयाला दिली. परंतू ही यंत्रे डाॅक्टरांना हाताळता न येणे म्हणजे, त्यांच्या अल्पज्ञान नाही तर ढेपाळवृत्तीच म्हणावे लागेल.

डाॅक्टरांच्या ढेपाळवृत्तीमुळेच तालुका निर्मितीसाठी झटणारे, तालुक्यातील तमाम जनतेच्या समस्यासाठी धावून जाणारे, माजी सभापती, कांग्रेसचे तालुका अध्यक्ष शामलाल मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

                                       डी- फेब्रीलेटर मशीन

विज्ञान युगात काळानुरुप बदल घडवून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी येथील ग्रामीण रुग्णालयात यंत्र सामुग्री उपलब्ध करून दिली. पण हे यंत्र डाॅक्टरांना हाताळता येत नाही. येथे तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती सुध्दा करण्यात आली नाही. आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध असूनही त्यांचा उपयोग न करता आल्याने मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कोरची तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा शासनाने पुरवठा केला आहे. पण या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे अत्याधुनिक यंत्रसामुग्री असूनही उपचार केला जात नाही. शामलाल मडावी यांच्या उपचारादरम्यान मी प्रत्यक्ष तिथे उपस्थित असतांंना असलेला यंत्रसामुग्रीचा उपयोग करता न आल्याने दुर्दैवी निधन झाले त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात यावी.

मनोज अग्रवाल – जिल्हा महासचिव राष्ट्रीय काँग्रेस तथा नगरसेवक नगरपंचायत कोरची

नेहमी भोंगळ कारभाराकरीता चर्चेत राहणारे ग्रामीण रुग्णालय कोरची येथील हा प्रकार

शामलाल मडावी यांना छातीत दुखु लागल्यामुळे त्यांना भरती करण्यात आले होते. हृदयाचे ठोके वाढत होते व त्यांना श्वास घेण्यास अडचण होत होती. अशावेळेस त्यांना ग्रामीण रुग्णालय कोरची येथे उपलब्ध असलेली डी-फेब्रीलेटर मशिनीने शॉक देण्याचे गडचिरोली येथील तज्ञांनी सांगितले परंतु मशीन शुरू करायची कशी हेच वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत व तेथील चमुना समजेना.

सदर मशीन सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. अशातच खुप उशीर झाला. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. परंतु गडचिरोली गाठण्यापुर्वीच शामलाल मडावी यांची प्राणज्योत मालविली.

जर सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांंना असे उपचार मिळत असेल तर मग आम जनतेची काय निगा राखली जात असेल हे यावरून दिसून येते. ग्रामीण रुग्णालय कोरची येथील प्रत्येक मशिनीची चौकशी करन्यात यावी अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.

सोनोग्राफी मशीन करीता टेकनीशियन आठवडयातून एकदा कुरखेडा येथून येतो व त्या दिवशी डी- फेब्रीलेटर मशीन शुरू होत नव्हती परंतु आता डॉ. धुर्वे यांनी सांगितले आहे तर आता मशीन शुरू होत आहे.

डॉ. राऊत – वैद्यकीय अधिकारी
ग्रामीण रुग्णालय, कोरची

हे देखील वाचा  :

सुरजागड प्रकल्पाला मदत करणाऱ्या त्या बड्या लोकांना नक्षल्यांचा पत्रकातून निर्वाणीचा इशारा..

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती

धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या

Comments are closed.