Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा, 21 जुलै:  बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र वडिलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीनं आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, वडिलांनी  गळफास घेत आत्महत्या केली आहे.

55 वर्षीय आरोपीनं(वडील) यापूर्वीही आपल्या 14 वर्षीय सावत्र मुलीचा विनयभंग केला होता. तेव्हा आरोपी सात दिवस फरार झाला होता. दरम्यान त्यानं पुन्हा एकदा आपल्या मुलीचा विनयभंग केला. यामुळे पीडित मुलीनं आपल्या सावत्र वडिलांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांनी रविवारी 55 वर्षीय सावत्र बापाविरोधात बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात असतानाच, आरोपी वडिलांनी जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही खळबळजनक घटना उघडकीस येताच, मृताच्या नातेवाईकांत आणि तक्रारदार मायलेकीत चांगलाचं वाद उफळला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमधील वाद मिटवला आहे. पोलिसांनी आरोपी व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आरोपीनं यापूर्वीही आपल्या सावत्र मुलीचा विनयभंग केला होता. त्यावेळी तो तब्बल सात दिवस घराबाहेर होता. दरम्यान त्यानं पुन्हा आपल्या मुलीचा विनयभंग केला. त्यामुळे पोलिसांनी याची गांभीर्यानं दखल घेत आरोपीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.

त्यामुळे पोलिसांनी रविवारी शोध मोहिम थांबवली होती. पण आरोपीनं मंगळवारी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. आरोपीनं चुकीच्या आरोपांमुळे आत्महत्या केली की पश्चातापातून याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! पैश्याच्या वादातून मुलाने केली आईची हत्या!

सुरजागड लोहप्रकल्प रद्द करा : राज्यपालांकडे शेकडो ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी केली मागणी

श्रमदानातून वृक्षारोपण आणि तण निर्मुलनासह फळ झाडे लावण्यावर भर द्यावा : डॉ किशोर मानकर, वनसंरक्षक, गडचिरोली

Comments are closed.