Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

श्रमदानातून वृक्षारोपण आणि तण निर्मुलनासह फळ झाडे लावण्यावर भर द्यावा : डॉ किशोर मानकर, वनसंरक्षक, गडचिरोली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २० जुलै : वनसंपदेन नैसर्गिकरित्या नटलेला जिल्ह्याची ओळख असली तरी वनविभागाचे कार्य अविरतपणे सुरु आहे. वनामध्ये वनकर्मचारी नेहमीच वनाचे संरक्षण करीत असतात याशिवाय रोपवन, रोपवाटिका, मृदा व जलसंधारण इत्यादी कामात सदैव संवर्धन करीत असतात.

वन विभागाच्या कार्यालयीन कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य समजून अप्रत्यक्षपणे वनसंवर्धनाचे कामांमध्ये सहभाग नोंदवीत असून सध्या पावसाचे दिवस असल्याने गडचिरोली येथील वनसंरक्षक तसेच उपवनसंरक्षक कार्यालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत वनसंरक्षक कार्यालयाच्या मोकळ्या जागेत श्रमदानातून फळझाडांची लागवड केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यामध्ये सागवान वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय सागवान वृक्ष कठीण मजबूत असल्याने जगभरात मोठी मागणी वाढली आहे. आणि जिल्ह्यात सागवानामुळे मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे.

याशिवाय इतर प्रजातीचे वृक्षही मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यात हळदु, अंजन, ऐन इत्यादी वृक्ष वनामध्ये सापडतात. त्याचप्रमाणे विविध पक्षी वन्यप्राणी आढळून येतात. शासनाच्या विविध योजनेमार्फत फळ झाडाचे वाटप करून प्रत्येक शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा मानस आहे. त्यासाठी शासनही काम करीत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

फळझाडापासून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी माणूस जितका समृद्ध होण्यास प्रयत्नशील असतो तितकेच फळझाडातून पशुपक्ष्यांसाठी खाद्य हि निर्माण होत असते. म्हणूनच काळाची गरज ओळखून फळझाड लावण्याची आवश्यकता लक्षात घेऊन वनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात फळांची आंबा, सिताफळ, बोर, चिंच  वृक्ष लागवडी सोबतच परिसरात वाढलेल्या भुतंगांजा (रानतुळस) या उपद्रवी तणांचे सुद्धा निर्मूलन सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून यानिमित्ताने केले.

फळझाडाचे योग्य संवर्धन झाल्यास हा परिसर पशुपक्षांच्या वास्तव्याने अधिकच फुलून उठेल असे वक्तव्य डॉ. किशोर मानकर मुख्य वनसंरक्षक यांनी फळझाडाचे रोप लावून कर्मचाऱ्यासोबत प्रतिपादन केले.

वनकर्मचाऱ्यांनी श्रमदान केल्यानंतर त्यांना उत्तम प्रजातीच्या शेवगा व केळीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या राबवलेल्या श्रमदान उपक्रमात कुमार स्वामी, उपवनसंरक्षक, सोनल भडके, सवस, धीरज ढेम्बरे वनपरिक्षेत्र अधिकारी, कुमारी शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रमोद जेनेकर वनपाल, अरूप कन्नमवार, फाये वनपाल, चंदू बावनवाड़े, नितेश सोमलकर, महेंद्र गावंडे,  भरत अल्लीवार किशोर सोनटक्के, उमेश बोरावार, धम्मराव दुर्गंवार, सिद्धार्थ मेश्राम, राजू कोडप, ताराचंद महाशाखेत्री, अजय जवडे, अजय कुकडकर, दिवाकर वडसकर, रवि बंसोड़ इत्यादिंनी सहभाग घेतला.

हे देखील वाचा :

सुरजागड लोहप्रकल्प रद्द करा : राज्यपालांकडे शेकडो ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी केली मागणी

जेव्हा विहिरीतून अचानक गरम पाणी येते…

Comments are closed.