Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भू-गटार योजनेतील दुर्गंधीयुक्त पाणी अनेकांच्या घरात; जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव

बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथे नागरिकांच्या घरात चेंबर मधून आउटलेट चे घाण-पाणी घुसत असल्याने ही योजना पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याने नागरिक त्रस्त आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलडाणा, दि. २१ जुलै : संत नगरी शेगाव येथे विकास आराखडा अंतर्गत शहरात भू गटार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या योजनेमुळे दर पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या घरात चेंबर मधून आउटलेट चे घाण-पाणी घुसत असल्याने ही योजना पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याने नागरिक त्रस्त आहेत.

अशातच मंगळवारी शिवसेनेचे नगरसेवक दिनेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना प्रभागात बोलावून घेराव घातला. तर अधिकाऱ्यांना शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये नेऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामध्ये सर्वाधिक त्रास प्रभाग क्रमांक ७ आणि ८ मधील नागरिकांना होत असल्याने याभागाचे शिवसेनेचे नगरसेवक दिनेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे यांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रभागांमध्ये बोलावून त्यांची चांगलीच कानउघडणी केली. एवढेच नव्हे तर घेराव घालून त्यांच्यावर चेंबर मधून काढलेले घाण पाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान या अधिकाऱ्यांना शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये नेऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न होत असतानाच अधिकाऱ्यांनी ८ दिवसात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. 30 तारखेपर्यंत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास चेंबरमधील घाण पाणी टँकरमध्ये भरून खामगाव येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे संपूर्ण कार्यलयात टाकण्याचा इशारा यावेळी नगरसेवक शिंदे यांनी दिला.

हे देखील वाचा :

धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या

धक्कादायक!! पैश्याच्या वादातून मुलाने केली आईची हत्या!

सुरजागड लोहप्रकल्प रद्द करा : राज्यपालांकडे शेकडो ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी केली मागणी

Comments are closed.