Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 22 जुलै:  तहसिल कार्यालय, धानोरा येथे जिल्हाधिकारी, गडचिरोली दिपक सिंगला यांचे हस्ते तालुक्यातील मौजा गोडलवाही, कामनगड, रेचे, सावरगांव, बोदीन, कुलभटी, कनगडी, पेंढरी, गायडोंगरी इत्यादी गावातील 67 नागरीकांना वनहक्क पट्टयांचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी केंद्र शासनाच्या कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मौजा मुस्का, खामतळा, मेंढा, येरकड, जागंदा बु. येथील 5 लाभार्थ्याना वीस हजार रुपाया प्रमाणे १ लक्ष रुपयाचे धनादेशाचे वितरण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तहसिल कार्यालयाचे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक सिंगला, जिल्हाधिकारी गडचिरोली, प्रमुख अतिथी महेन्द्र गणवीर, प्रभारी उप विभागीय अधिकारी गडचिरोली, तहसिलदार सी.जी. पित्तुलवार हे मंचावर उपस्थित होते.

वनहक्क अधिनियम सन 2005 अस्तित्वात आल्यापासून प्रथमच धानोरा तालुक्यात वरीष्ठ अधिकारी जसे जिल्हाधिकारी यांचेकडून वनहक्क पट्टे वितरणाचा कार्यक्रम झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमात ज्या नागरिकांचे वैयक्तिक वनहक्क पट्टे काही तांत्रीक कारणास्तव प्रलंबीत असतील त्यांनी तहसिलदार व उप विभागीय अधिकारी यांचे मार्फतीने प्रस्ताव सादर करावे. त्यांना सुध्दा अशाच प्रकारे कार्यक्रमाचे माध्यमाने पट्टयाचे वितरण करता येईल असे उद्गार जिल्हाधिकारी महोदयांनी केले.

पट्टे वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेन्द्र गणविर, प्रभारी उपविभागीय अधिकारी, गडचिरोली यांनी केले, आभार प्रदर्शन ङि एम.वाकुलकर, नायब तहसिलदार यांनी तर संचालन वनिश्याम येरमे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते साठी ङि.आर.भगत, नायब तहसिलदार, चंदु प्रधान पुरवठा निरीक्षक, तुळशिराम तुमरेटी नायब नाझर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास तहसिल कार्यालयाचे सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते..

हे देखील वाचा :

सुरजागड प्रकल्पाला मदत करणाऱ्या “त्या” बड्या लोकांना नक्षल्यांचा पत्रकातून निर्वाणीचा इशारा..

मोठी बातमी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षांनी नाशिकचा सुपुत्र झाला बॅरिस्टर

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या १९.९६ लाखांच्या थकित कर्जाची भाजपकडून परतफेड; लोणकर कुटुंबीयांना मोठा दिलासा

 

Comments are closed.