Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या १९.९६ लाखांच्या थकित कर्जाची भाजपकडून परतफेड; लोणकर कुटुंबीयांना मोठा दिलासा

भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांच्या धनादेश स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना सुपूर्द.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, २२ जुलै :  एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना हा १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबीयांवर कर्ज होते. आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते. अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबीयांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोठी बातमी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षांनी नाशिकचा सुपुत्र झाला बॅरिस्टर

नशीब बलवत्तर म्हणून पुराच्या पाण्यात युवक वाहून सुद्धा बचावला थोडक्यात!

 

Comments are closed.