Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई मधील शिवाजी पार्कचं नामांतर.

या आधी शिवाजी पार्कचे पहिले नाव माहिम पार्क असं होतं.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क :- मुंबई येथील दादरमधील प्रसिद्ध शिवाजी मैदानाचं नाव अखेर बदलण्यात आलं आहे. शिवाजी पार्क मैदान यापुढे ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ या नावाने ओळखले जाणार आहे. अलीकडेच महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. या मैदानाच्या नामांतराचा प्रस्ताव मार्च महिन्यात पालिका सभागृहात मांडण्यात आला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभा होतात. सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचेही आयोजनही या मैदानात होते. १० मे १९२७ रोजी मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्याचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यामुळं तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचे नाव बदलण्यात आलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिवाजी पार्कचे पहिले नाव माहिम पार्क असं होतं. १० मे १९२७ रोजी मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्याचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यामुळे मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामकरण करण्यासाठी शिवसेनेने पालिकेकडे पाठपुरावा केला.

Comments are closed.