Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू 

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुलगाव, दि. २६ डिसेंबर : पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रोहणा येथे दुचाकीने शेतातून घरी परत येत असलेल्या बाप-लेकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील बाप-लेकाचा मृत्यू झाला. हा अपघात रोहणा-पिंपळखुटा मार्गावर झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विजय गाणार (५४) तर अविश गाणार (३०) दोन्ही रा. नेहरू वॉर्ड रोहणा, अशी मृतांची नावे आहेत. विजय व अविष हे दोघे बाप-लेक शेतात गेले होते. विजय गाणार यांनी यंदा शेतात मिरचीची लागवड केली आहे. मिरचा तोडा केल्यावर हे दोघेही सायंकाळी दुचाकीने घरी परत येत असताना भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देत घटनास्थळावरून पळ काढला.

अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे ‘महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्काराने सन्मानित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य

सुपरस्टार अभिनेता सलमान खान ला सर्पदंश.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.