Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात! ट्रॅव्हलबस व ट्रकची जोरदार धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू तर प्रवासी गंभीर जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. १४ जानेवारी : नागपूरहून चंद्रपूरला भरधाव वेगाने येत असलेली ट्रॅव्हल बस डिव्हायडर ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर जाऊन समोरून येणा-या ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात ट्रक व ट्रॅव्हलचे दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वरोरा येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून चंद्रपूरला येत असलेली ही बस जाम येथे काही काळ थांबली होती. तिथून निघाल्यावर चालकाने ती बस वेगाने चालवत असतांना याच वेळेस बसचा चालकाने मागे वळून प्रवासी मुलीसोबत बोलत असताना, बसवरचे नियंत्रण सुटून ती डिव्हायडर ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली व समोरून भरवेगात येणा-या ट्रकवर जाऊन धडकली. हि धडक इतकी जोरदार होती की, बसचा समोरचा भाग ट्रकच्या केबिनच्या आत गेला. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या अपघाताने प्रवासीही काही क्षणासाठी धक्काच बसला. या अपघातात काही प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्या उपचारार्थ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जहाल नक्षल करण ऊर्फ दुलसा नरोटेला पोलिसांनी केली अटक

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.