Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली : ३० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू, जिल्हयात आज ८८ कोरोनाबाधित तर ३० कोरोनामुक्त…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १५ जानेवारी : गडचिरोली जिल्हयात ८०० कोरोना तपासण्यांपैकी ८८ नवीन कोरोना बाधित झाले असून ३० जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३१५०३ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३०२५१ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ५०२  झाली आहे. एका मृत्यूमध्ये गोंदिया जिल्हयातील सडक अर्जूनी तालुक्यातील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७४९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०३ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १.५९ टक्के तर मृत्यू दर २.३८ टक्के झाला आहे. तीला सीकल सेल आजार होता.

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ४७, अहेरी तालुक्यातील १२, आरमोरी तालुक्यातील ०२, भामरागड तालुक्यातील ०४, चामोर्शी तालुक्यातील 00, धानोरा तालुक्यातील ०३, एटापल्ली तालुक्यातील ०३, मुलचेरा तालुक्यातील 00, सिरोंचा तालुक्यातील ०१, कोरची तालुक्यातील ०२, कुरखेडा तालुक्यातील ०५, आणि वडसा तालुक्यातील ०९ जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या ३० रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील २१, भामरागड तालुक्यातील ०१, चामोर्शी तालुक्यातील ०७, आणि मुलचेरा तालुक्यातील ०१ जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 

जहाल नक्षल करण ऊर्फ दुलसा नरोटेला पोलिसांनी केली अटक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.